खेड रेल्वे स्थानकावर प्रवाशाची बॅग लंपास; आयपॅड आणि चांदीची चेन चोरीला

खेड : खेड रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षालयातून (waiting room) एका प्रवाशाची बॅग चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरुवारी, दिनांक ०३/०७/२०२५ रोजी सकाळी घडली. या बॅगेत एक अॅपल कंपनीचा आयपॅड आणि चांदीची चेन असा एकूण १५,६०० रुपये किमतीचा ऐवज होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील रहिवासी असलेले आणि सध्या सिल्वासा येथे शिक्षण घेणारे २१ वर्षीय विश्व संतोष खुरसडे हे खेड रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षालयात थांबले होते. याच दरम्यान, सकाळी ८.१० ते सायंकाळी ५.१० या वेळेत अज्ञात चोरट्याने त्यांची काळ्या रंगाची कॉलेज बॅग चोरली.

चोरट्याने लंपास केलेल्या बॅगेत १५,००० रुपये किमतीचा अॅपल कंपनीचा १०.०२ इंच लांबीचा, ०९ जनरेशनचा आयपॅड आणि ६०० रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची चांदीची चेन होती. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी खेड रेल्वे पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा क्र. २१४/२०२५ दाखल केला आहे. अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 04-07-2025