वाहतुकीला अडथळा करणाऱ्या २६६ वाहन चालकांवर लांजा पोलिसांची कारवाई

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरात सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या २६६ वाहन चालकांवर लांजा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यामध्ये एकूण १ लाख ७८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. लांजा पोलिसांच्या या कारवाई मोहिमेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा सर्व्हिस रोड करण्यात आलेला असताना मात्र काही वाहनचालक आपली दुचाकी व चारचाकी वाहने वाहतुकीला अडथळा होईल, अशी बिनधास्तपणे उभी करत असतात. त्यामुळे बाजारपेठेत महामार्गावर वाहतुक कोंडी ची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे मुंबई-गोवा मार्गावर बाजारपेठेत वाहनांना अडथळा होऊन नागरिक, व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागतो. वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर लांजा पोलिस ठाण्याकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती.

दरम्यान वाहतुकीला अडथळा करणाऱ्या वाहन चालकांवर लांजा पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २६६ वाहन चालकांवर केलेल्या करवाईतून १ लाख ७८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. यापुढे देखील कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 04/Jul/2025