मेर्वीत स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत

पावस : ढोलताशांच्या गजरात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, असा जयघोष करत भक्तिमय वातावरणात मेर्वी येथील मठात स्वामी समर्थांचा पालखी सोहळा उत्साहात झाला.

कणकवली येथून ही पालखी आणण्यात आली. स्वामी समर्थ परिवार राजिवडे यांच्यातर्फे प्रकाश फडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ मूर्ती व पादुकांवर अभिषेक, पूजा, मंत्रपुष्पांजली करण्यात आली.

कार्यक्रमाला पुजारी सहदेव पावसकर, श्यामसुंदर मेस्त्री, महेश वायंगणकर, पार्थ मापारी, बाबाजी सावंत, अनिल कुर्ले, विद्याधर पाटकर, महेश गुराम, महेश माळकर, अद्वैत मिरजकर, नम्रता मेस्त्री, सुहासिनी मेस्त्री, शैलेश माळकर, प्रसाद मिरजकर, प्रिया मिरजकर, सदानंद परूळेकर, प्रसाद आठले, कोमल आठले आदी भाविक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 04/Jul/2025