गुहागर : रिगल कॉलेज शृंगारतळीच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत आबलोली ग्रामपंचायत परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत ग्रामपंचायत, बौद्धवाडी, कोष्टेवाडी, आबलोली बाजारपेठ तसेच बौद्धविहार परिसराची स्वच्छता करण्यात आली.
सर्वप्रथम महाराष्ट्र कृषिदिनाच्या औचित्याने ग्रामपंचायत आबलोली आयोजित वसुंधरा अभियानामध्ये वृक्षारोपण करून या स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के, संचालिका डॉ. सुमीत शिर्के तसेच रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 04/Jul/2025














