रत्नागिरी : तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा रत्नागिरी यांच्या वतीने, शहर शाखा रत्नागिरी यांच्या मार्फत संस्थेच्या माजी जिल्हा पदाधिकारी, केंद्रीय शिक्षिका सत्यशिला शाहू पवार, रत्नागिरी (मारुती मंदिर) यांचे निवासस्थानी दिनांक १८/०९/२०२४ रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी वर्षावास कार्यक्रम तालुका उपाध्यक्ष व संस्कार विभाग प्रमुख संजय कांबळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात तालुका व गाव शाखा पदाधिकारी व धम्म बांधव यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते आदर्श तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून दिपप्रज्वलन करून करण्यात आली व संपूर्ण सुत्रपठण घेण्यात आले. यानंतर जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी तसेच उपस्थित मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर वर्षावास मालिकेतील आजचा विषय भाद्रपद पौर्णिमेचं महत्त्व व महामंगल सुत्त या विषयावर प्रवचनकार, श्रामणेर बौद्धाचार्य व पाली भाषेचे अभ्यासक नंदकुमार यादव, निवेंडी भगवतीनगर यांनी भाद्रपद पौर्णिमेचं महत्त्व त्याचप्रमाणे ज्याला दुर्जनांचा सहवास प्रिय वाटतो, आळस, सभाप्रिय असतो, शक्य असूनही आई वडिलांची सेवा न करणे, जूगार, व्यसनाधीनता यांच्या अधीन होतात. थोडक्यात त्यांच्या मनावर संयम नसतो अशी अनेक कारणे सांगून, आजच्या महामंगल सुत्त या विषयावर विस्तृतपणे विविध उदाहरणे देऊन अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलं.
जिल्हा अध्यक्ष अनंत सावंत व उपाध्यक्ष, संस्कार विभाग प्रमुख विजय जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष व तालुका संस्कार विभाग प्रमुख संजय कांबळे यांनीही आपले धम्म विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रामणेर बौद्धाचार्य, तालुका संस्कार विभाग सचिव, गौतम सावंत यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लाभली ती माजी राज्य पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष तु. गो. जाधव, विद्यमान जिल्हा अध्यक्ष अंनत सावंत, जिल्हा उपाध्यक्ष व संस्कार विभाग प्रमुख विजय जाधव, जिल्हा कार्यालयीन सचिव विजय कांबळे, माजी शहर शाखा अध्यक्ष ल. सु. सावंत, तालुका अध्यक्ष विजय मोहिते, सचिव दिपक जाधव, कोषाध्यक्ष भगवान जाधव, संस्कार विभाग प्रमुख संजय कांबळे, सचिव गौतम सावंत, तालुका हिशोब तपासणीस दिपक पवार, माजी तालुका पदाधिकारी शशिकांत कांबळे, बौध्दाचार्य व पाली भाषेचे अभ्यासक दिलीप वासनीक सर, विलास जाधव,, शरद कांबळे आदी मान्यवर व महिला पदाधिकारी, सदस्य व धम्म बांधव उपस्थित होते.