चिपळूण : येथील बहादुरशेख नाका, अलोरे एस.टी. स्टॉपजवळ, चिपळूण-कराड रोडवरील चिपळूण नागरी पतसंस्थेसमोर सार्वजनिक रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची टाटा मॅजिक (एमएच ०८/ई/१७७३) वाहतुकीस अडथळा निर्माण करेल अशा पद्धतीने उभी करून चालक निघून गेल्याची घटना गुरुवारी, दिनांक ०३/०७/२०२५ रोजी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अशोक कृष्णा शिंगाडे (पोहेकॉ/६०६) यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल अनंत मोहिते (वय ३२, रा. पोफळी पवारवाडी, ता. चिपळूण) याने त्याच्या ताब्यातील टाटा मॅजिक गाडी रस्त्यातच बेजबाबदारपणे सोडून दिली होती. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता, तसेच पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ नुसार गुन्हा क्र. १४९/२०२५ दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन आरोपी स्वप्निल मोहिते याचा शोध सुरू केला आहे. अशा प्रकारे सार्वजनिक रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहने सोडून जाणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 04-07-2025














