रत्नागिरी : शहरातील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करत गोंधळ घातल्याची घटना गुरुवारी, दिनांक ०३/०७/२०२५ रोजी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अभिजीत बाजीराव पाटील (पोहेकॉ/१५४६) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अशोक वसंत मालप (वय ५३, रा. पानगलेवाडी, पावस, ता.जि. रत्नागिरी) हा इसम सार्वजनिक ठिकाणी, म्हणजेच न्यायालयाच्या इमारतीतच, मद्याच्या नशेत मोठ्याने ओरडत होता.
या घटनेमुळे न्यायालयाच्या कामकाजात व्यत्यय निर्माण झाला, तसेच उपस्थित नागरिकांनाही त्रास झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मालप याला ताब्यात घेतले.
या प्रकारणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ (१) (२) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०/११७ प्रमाणे गुन्हा क्र. २८६/२०२५ दाखल करण्यात आला आहे. दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात असल्याचे या घटनेतून दिसून येते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 04-07-2025














