रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे पत्नीचे निधन झाल्याने मानसिक तणावात असलेल्या वृध्दाने खाडीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० ते सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.१५ वा. कालावधीत घडली आहे. गोविंद सदू चांदिवडे (वय ६४, रा. करजुवे चांदिवडेवाडी, संगमेश्वर) असे खाडीत उडी घेत आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. गोविंद चांदिवडे यांच्या पत्नीचे ८ महिन्यांपूवी निधन झाले होते. तेव्हापासून ते मानसिक तणावाखाली होते. या नैराश्यातूनच त्यांनी रविवारी रात्री करजुवे खाडीपात्राच्या पाण्यात उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 16/Oct/2024