लांजा : शेतीला आधुनिकतेची जोड मिळाल्यामुळे शेतीत अनेक बदल घडत आहेत आंबा, काजू, फणस यापुरते न राहता शेतकऱ्यांनी वनशेतीकडे वळायला हवे. सर्वात जास्त उत्पन्न बांबूपासून मिळते. कोकणात बांबूला पोषक वातावरण असून, कमी मेहनतीत सहज उत्पन्न मिळते. म्हणून कोकणात बांबूचा प्रसार करायला हवा, असे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी केले.
स्वातंत्र्यसेनानी स्व. शिवाजीराव सावंत लांजा तालुका सहकारी कुक्कुट व्यावसायिक संस्थेतर्फे कृषिदिन व स्व. शिवाजीराव सावंत यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लांजा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी नारळ संशोधन केंद्राचे माजी प्रमुख डॉ. दिलीप नागवेकर, प्रक्रिया उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी श्रीराम वंजारे, लांजा कुक्कुटपालन संस्थेचे अध्यक्ष विवेक सांवत, उपाध्यक्ष सचिन भिंगार्डे आदी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. कद्रेकर म्हणाले, शेतीप्रधान देश म्हणतो; पण शेतीविषयी वाचन शून्य आहे. शेतीसंबंधीच जे जे काही वाचनीय असेल ते घेतले पाहिजे, प्रत्यक्ष कृतीत आणले पाहिजे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 04/Jul/2025














