रत्नागिरी : अरबी सागर आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्याची स्थिती प्रभावहीन ठरल्याने परतीच्या पावसाला अनुकूलता प्राप्त झाली आहे. त्यामुळे किनारी जिल्ह्यात बुधवारपासून अवकाळीची प्रभावही कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, मंगळवारी संपलेल्या २४ तासात रत्नागिरी जिल्हयात १८.३३ मि.मी. च्या सरासरीने १६४ मि. मी. एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड तालुक्यात १०, दापोली, खेड प्रतयेकी २०, गुहागरमध्ये १५, चिपळूणात ८, संगमेश्वर तालुक्यात १८, रत्नागरीत सर्वाधिक ३० मि.मी. तर लांजा व राजापूर तालुक्यात अनुक्रमे २२ आणि १७ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजे १ जूनपासून सरासरी ४२७२ मि.मी. (१२७ टक्के) इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 16-10-2024









