पाचल : ग्रामीण भागात शिक्षण हे आजही मोठं आव्हान आहे. कारण दळणवळणासाठी पुरेशी साधणं उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो. त्यातच कमी होणारी पटसंख्या ही मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पोहचणं अत्यंत गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन गेली अनेक वर्षे आमच्या संस्थेच्या माध्यमातून मोफत शैक्षणिक साहित्य पोहचविण्याचे काम करीत असल्याचे सफाई कामगार परिवर्तन संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश हरळकर यांनी सांगितले.
सफाई कामगार परिवर्तन संघामार्फत राजापूर तालुक्यातील हरळ, पाचल, परूळे, ताम्हाणे, करक, कारवली मूर, वाळवड, काजिर्डा, रायपाटण आणि आजूबाजूच्या ५०० शाळकरी विद्यार्थ्यांना हरळ गावात आयोजित कार्यक्रमात मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी हरळकर बोलत होते.
या शैक्षणिक उपक्रमाला अर्बन बँकेच्या संचालक प्रतिभा रेडीज, सामाजिक कार्यकर्त्या शशीकला देवरूखकर, पाचलचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, पाचल विभागाचे केंद्र प्रमुख अनाजी मासये, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर जाधव, मुंबई हॉटेलचे मालक संजय रायबागकर, यश कॉम्प्युटरचे संचालक प्रकाश सावंत, जिजामाता विद्यामंदिर रायपाटणचे कुंभार सर, रायपाटण पोलीस ठण्याचे रामदास पाटील, सरपंच माधवी पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य अनिता तांबे, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 04/Jul/2025














