चिपळूण : अडरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची तीस वर्षांनी भेट

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील अडरे येथील परशुराम शिक्षण संस्था मुंबई संचलित पी. के. सावंत माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष १९९५-९६ सालातील दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

सुमारे ३० वर्षानंतर झालेली विद्यार्थ्यांची भेट अविस्मरणीय ठरली. वर्ष १९९५-९६ सालातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन शाळेच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक देविदास शिंदे होते.

विचारमंचावर विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका व या बॅचच्या मराठीच्या शिक्षिका सुषमा इंदुलकर तसेच शिक्षक दत्ताराम निर्मळ, शिक्षिका सौ. पेढामकर, सौ. पाटेकर, लिपिक सावंत तसेच निवृत्त नाईक हरिश्चंद्र पवार यांच्यासह शालेय कर्मचारी प्रमोद पवार, नंदकुमार तांदळे यांच्यासह दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे अनोख्या पद्धतीने पुष्प वर्षाव करून स्वागत केले. तर नंतर कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व गुरुजनांचे व शालेय कर्मचाऱ्यांचे स्वागत आणि सत्कार सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सर्व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माजी विद्यार्थी संदेश पवार यांनी कार्यक्रमामागची भूमिका विशद केली. तद‌्नंतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या कामासाठी आर्थिक मदत निधी देण्यात आला.

यावेळी माजी विद्यार्थी अभियंता प्रवीण कदम, मनिषा पिटले , माजी सैनिक नंदकुमार शिगवण, भारती पवार, वैशाली पन्हाळकर, रूपाली महाडिक, नितीन कांबळे यांनी आपले विचार मांडले. शाळेविषयीच्या अनेक आठवणी सांगितल्या. शिक्षकांच्या वतीने सौ. सुषमा इंदुलकर, दत्ताराम निर्मळ व मुख्याध्यापक देविदास शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी प्रवीण कदम, प्रमोद पवार, निलेश कदम, समीर कदम, नंदकुमार शिगवण, संदेश पवार, तनुजा जाधव, रूपाली महाडिक, भारती पवार, वैशाली पन्हाळकर, उज्वला शिंदे, योगेश पवार, नितिन कांबळे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 04-07-2025