राजापूर : आषाढी एकादशी आणि मोहरम सण एकाच दिवशी येत असल्याने हिंदु आणि मुस्लिम समाज बांधवांनी शांततेत साजरे करण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक नितिन बगाटे यांनी दिल्या. आषाढी एकादशी दिंडी आणि मोहरम ताबूत मिरवणुकीच्या वेळा निश्चित करून मिरवणुकीमध्ये अंतर ठेवण्यात यावे अशा सूचना पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
रविवार ६ जुलै रोजी हिंदु बांधवांचा आषाढी एकादशी उत्सव आणि मुस्लिम बांधवांचा मोहरम सण एकाच दिवशी येत असल्याच्या पार्श्वभूमीर पोलिस अधिक्षक नितिन बगाटे यांनी दोन्ही समाजातील प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेत सण शांततेत साजरे करण्याबाबत मार्गदर्शन केले. तर पोलिस अधिक्षक नितिन बगाटे यानी दिंडी आणि ताबूत मिरवणुक मार्गाची दोन्ही समाजातील प्रतिनिधींसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.
बुधवारी राजापूर पोलिस ठाण्यात ही बैठक पार पडली. यावेळी विठ्ठल मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने संदिप मालपेकर, राजेंद्र कुशे, दिनानाथ कोळवणकर तर जामा मशिद व्यवस्थापनाचे वतीने एड. जमिर खलिफे, सुलतान ठाकूर तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, राजापूर पोलीस निरिक्षक अमित यादव उपस्थित होते.
रविवार ६ जुलै रोजी मुस्लीम बांधवांचा मोहरम सण व हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी सण हा एकाच दिवशी साजरा होत आहे. आषाढी एकादशी निमित्त राजापूर विठ्ठल मंदिर ते बाजारपेठ चिंचबांध भक्त पुंडलिक मंदिर अशी सवाद्य दिंडी काढली जाते. तर मोहरम निमित्त ताबुत मिरवणुकही काढली जाते. त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी पदभार लांजा उपविभाग निलेश माईनकर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, जिल्हा विशेष शाखा रत्नागिरी, विवेक पाटील तसेव राजापूर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अमित यादव यांचे समवेत पायी चालत जावून मिरवणूकीचा मार्गाची पाहणी केली.
मिरवणुकी मार्गाबाबत मुस्लीम समाजातील जामा मशिदीचे अध्यक्ष जमिर खलिफे, सुलतान ठाकूर यांचेकडून मोहरम मिरवणुकीच्या मार्गाबाबत संपुर्ण माहीती घेण्यात आली. मिरवणुकी काढण्यासाठी संबंधित विभागीच्या रितसर परवानग्या घेण्याबाबत त्यांना सुचना दिलेल्या आहेत. तसेच मिरवणूकीमध्ये दोन्ही समाजीतील लोकांची मिरवणूक ही समोर समोर येणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. मिरवणूक काढताना दोन्ही मिरवणूकीमध्ये वेळेमध्ये अंतर ठेवण्यात यावे अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. मिरवणूकी दरम्याने धार्मिक स्थळ या ठिकाणी मिरवणूक जास्त वेळ न थांबवता शांतेत मिरवणूक काढणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.
तसेच हिंदू समाजातील लोकांची आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदीर ते गणेश घाट मार्ग काढण्यात येणारी मिरवणूकीबाबत व्यवस्थापक संदीप मालपेकर, दिनानाथ कोळवणकर यांचेकडून मिरवणूकी बाबत पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांनी आढावा घेतला. हिंदू समाजातील आषाढी निमित्त काढण्यात येणारी मिरवणूकीचा मार्गाची पुर्ण पाहणी करण्यात आली. दोन्ही मिरवणूक शांतेत काढल्या जातील याबाबत दोन्ही समाजातील संघनटेचे अध्यक्ष यांना पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांनी सुचना दिलेल्या आहेत.
रविवारी आषाढी एकादशी व मोहरम एकाच दिवशी असल्याने त्या अनुषंगाने राजापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सण उत्सव अनुषंगाने प्रभारी अधिकारी राजापूर यांना पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांनी सुचना देवून योग्यतो बंदोबस्त ठेवणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 04/Jul/2025













