स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’च्या ५४१ पदांसाठी मेगाभरती! पदवीधरांना सुवर्णसंधी

नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ५४१ प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. देशभरातील पदवीधर तरुणांसाठी ही एक उत्तम संधी असून, पात्र उमेदवारांनी १४ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

पदांचा तपशील आणि आरक्षण:

  • एकूण पदे: ५४१
  • आरक्षण:
    • अनुसूचित जाती (SC): ७५
    • अनुसूचित जमाती (ST): ३७
    • इतर मागासवर्गीय (OBC): १३५
    • आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS): ५०
    • खुला प्रवर्ग: २०३
  • दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव पदे: २० (LD – ५, VI – ५, HI – ५, D & E – ५) – ही दर्शविलेली पदे बॅकलॉगमधील राखीव पदे आहेत.

महत्त्वाची माहिती:

  • पात्रता: ३ सप्टेंबर २०२५ रोजी कोणत्याही शाखेतील पदवीधर.
  • वयोमर्यादा: १ एप्रिल २०२५ रोजी २१ ते ३० वर्षे.
  • वेतन श्रेणी: रु. ४८,४८० (प्रारंभिक मूळ वेतन) ते रु. ८५,९२०. मूळ वेतन रु. ५६,४८०/- (अगाऊ ४ वेतनवाढींसह) अधिक इतर भत्ते. अंदाजे वार्षिक वेतन (CTC) सुमारे रु. २०.४३ लाख.

निवड प्रक्रिया (तीन टप्प्यांमध्ये):

फेज-१: ऑनलाइन प्रीलिमिनरी परीक्षा (जुलै/ऑगस्ट २०२५ दरम्यान)

  • स्वरूप: ऑब्जेक्टिव्ह टाईप, १०० गुणांसाठी १०० प्रश्न, वेळ ६० मिनिटे.
  • विभाग: इंग्लिश लँग्वेज (४० प्रश्न), क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (३० प्रश्न), रिझनिंग अॅबिलिटी (३० प्रश्न). प्रत्येक विभागासाठी २० मिनिटे वेळ.
  • महत्त्वाचे: प्रत्येक सेक्शनला कट-ऑफ अपेक्षित नाही. पूर्व परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार मुख्य परीक्षेसाठी १:१० प्रमाणात निवडले जातील. कॉल लेटर जुलै २०२५ च्या तिसऱ्या/चौथ्या आठवड्यात उपलब्ध होतील.

फेज-२: मुख्य परीक्षा (सप्टेंबर २०२५ मध्ये)

  • भाग (i) ऑब्जेक्टिव्ह टाईप: २०० गुणांसाठी १७० प्रश्न, वेळ ३ तास.
    • रिझनिंग अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड (४० प्रश्न, ६० गुण, ५० मिनिटे)
    • डेटा अॅनालिसिस अँड इंटरप्रिटेशन (३० प्रश्न, ६० गुण, ४५ मिनिटे)
    • जनरल अवेअरनेस/इकॉनॉमी/बँकिंग नॉलेज (६० प्रश्न, ६० गुण, ४५ मिनिटे)
    • इंग्लिश लँग्वेज (४० प्रश्न, २० गुण, ४० मिनिटे)
  • भाग (ii) डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट: ५० गुण, वेळ ३० मिनिटे. इंग्लिश लँग्वेज (कम्युनिकेशन स्किल्स: ई-मेल्स, रिपोर्ट्स, सिच्युएशन अॅनालिसिस, सारांश लेखन).
  • नकारात्मक गुण: प्रीलिमिनरी आणि मुख्य परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नाच्या १/४ गुण वजा केले जातील.
  • निवड: मुख्य परीक्षेतील प्रत्येक सेक्शनमध्ये किमान पात्रतेचे गुण मिळवणे आवश्यक आहे. सरासरी गुणांनुसार कॅटेगरीनिहाय तात्पुरती निवड यादी बनवून १:३ प्रमाणात उमेदवारांना फेज-III साठी निवडले जाईल.

फेज-३: सायकोमेट्रिक टेस्ट आणि मुलाखत (ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२५ मध्ये)

  • सायकोमेट्रिक टेस्ट: Personality Profiling साठी घेतली जाईल. याचे निष्कर्ष मुलाखत पॅनेलसमोर मांडले जातील.
  • ग्रुप एक्सरसाईज आणि इंटरव्ह्यू: एकूण ५० गुणांसाठी (ग्रुप एक्सरसाईज २० गुण, मुलाखत ३० गुण).
  • अंतिम निवड: फेज-२ आणि फेज-३ मधील गुणांवर आधारित. फेज-२ चे २५० गुण ७५ गुणांमध्ये आणि फेज-III चे ५० गुण २५ गुणांमध्ये रूपांतरित करून, रूपांतरित १०० गुणांमधून अंतिम निवड केली जाईल.

परीक्षा शुल्क:

  • खुला/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी: रु. ७५०/-
  • (इतर प्रवर्गांसाठी शुल्काचा उल्लेख जाहिरातीत नाही, तो संबंधित संकेतस्थळावर तपासावा.)

अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी https://bank.sbi/web/careers/current-openings या अधिकृत संकेतस्थळावर १४ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत. अधिक माहिती आणि शंकासमाधानासाठी हेल्पडेस्क फोन नं. ०२२-२२८२०४२७ वर संपर्क साधता येईल किंवा suhaspatil237@gmail.com या ईमेलवरही विचारणा करता येईल.

ही एक मोठी संधी असून, इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.