चिपळुणात उद्या खैर रोपांचे वाटप

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात येणार आहे. चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात शनिवारी सकाळी १० ते ११:३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी वनवणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्रम होणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी रणजित गायकवाड आणि विभागीय वन अधिकारी (प्रा.) गिरिजा देसाई यांनी दिली. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत उपस्थित राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 04/Jul/2025