रत्नागिरी : अवकाळी पावसाने भातशेती धोक्यात

रत्नागिरी : गेले काही दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील भातशेती धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

तालुक्यात भातकापणीचा हंगाम सुरू झाला आहे. येथील शेतकरी आपले वर्षभराचे धान्य सुखरूप घरी आणण्यासाठी धडपड करत असतो. मात्र, ऐन भातकापणी हंगामातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने येथील भातशेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नाचणी पिकावर रोगसदृश स्थिती असून नाचणी पीकदेखील आडवे पडले आहे. दुपारनंतर अचानकपणे विजेच्या गडगडाटसह येत असलेल्या पावसाने शेतकरी वर्गाच्या नाकीनऊ आणले आहे. अनेक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून, नुकसानीची पाहणी शासनाने करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 16-10-2024