रत्नागिरी : आता मोबाइल अॅपवरून करता येणार सौर कृषिपंपाबाबत तक्रार

रत्नागिरी : राज्यात विविध योजनांमध्ये ५ लाख ६५ हजार सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. सौर पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी मोबाइल अॅप वरूनही नोंदविण्याची सुविधा महावितरणने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.

महावितरणने लाभार्थी शेतकऱ्यांना सौर कृषिपंप बिघडल्यास यापूर्वी संकेतस्थळावरून तक्रार करावी लागत होते. संबंधित पुरवठादार कंपनीच्या संकेतस्थळावर तक्रार करणे किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार करणे असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते. आता मोबाइलवरील महावितरणच्या अॅपद्वारेही तक्रार करता येणार आहे. तक्रार नोंदविताना शेतकऱ्याने सौर कृषिपंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक लिहिणे गरजेचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 04/Jul/2025