लांजातील ‘त्या’ चोरीच्या घटनेचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

लांजा : लांजा शहरात असलेल्या भरवस्तीमधील रॉयल पार्क इमारतीमधील सदनिकेचा मुख्य दरवाजा तोडून २ लाख ७१ हजार रुपये किमतीचा सोन्याच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना १८ दिवसांपूर्वी घडली होती. पोलिसांचा तपास सुरू असून या चोरीच्या घटनेचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या चोरीच्या घटनेचा उलघडा लवकरच होणार असल्याचे समजते.

चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात लांजा पोलिसांना यश येणार आहे. लांजा शहरातील रॉयल पार्क इमारतीच्या एका सदनिकेमध्ये दिनांक २९ सप्टेंबर रोजी भर दिवसा धाडसी चोरी घडली होती. नियमित वर्दळ असलेल्या ठिकाणी दिवसाढवळ्या काही मिनिटांच्या झालेल्या धाडशी चोरीच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

१ लाख २५ हजार रुपये किमतीचे कानातील रिंग, २.५ तोळे वजनाचे सोन्याच्या बांगड्या, ५ ग्रॅम वजनाचे कानातील रिंग, १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, सोन्याच्या दोन अंगठ्या असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवजावर चोरट्याने डल्ला मारला आहे.

या तपासाकामी रत्नागिरी येथून ऱ्यांबो नावाचे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान अर्ध्या वरच घुटमळल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. त्या दृष्टीने लांजा पोलीस कसून तपास करत आहेत. शहरात वास्तव्याला आलेल्या काही परप्रांतीय लोकांच्या दिशेनेही संशयाची सुई पोलिसांनी वळवली होती. त्यानंतर खेड व लांजा येथे झालेल्या चोरीच्या घटनेमध्ये साम्य असल्याचेही बोलले जाते होते. दरम्यान पोलिसांचा शांत आणि गतीने तपास सुरू होता. त्यामुळे या चोरीच्या घटनेचे काही धागेदोरे पोलिसांच्या हाती मिळाल्याचे सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे लांजा येथील रॉयल पार्क इमारतीमधील चोरीचा छडा लवकरच उघड होणार असून चोरटे जेरबंद होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 16/Oct/2024