डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ‘जूनियर रिसर्च फेलो’ पदाची संधी!

दापोली, रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत, दापोली येथील कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री येथे ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ (Tissue Culture) संशोधन व सुविधा केंद्र स्थापन करणे’ या प्रकल्पांतर्गत ‘जूनियर रिसर्च फेलो’ या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. कृषी आणि संबंधित क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

पदाचा तपशील:

  • पदाचे नाव: जूनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow – JRF)
  • पदांची संख्या: ०१
  • मासिक वेतन (एकत्रित): रु. २५,०००/-
  • नोकरीचे ठिकाण: कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री, दापोली, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

आवश्यक शैक्षणिक पात्रता:

  • Mega seed Production in Agril. Crops & Fishery (Revolving fund) या प्रकल्पासाठी:
    • बॅचलर ऑफ सायन्स (कृषी/बागकाम/वन/मत्स्यपालन/पशुवैद्यकीय/गृह विज्ञान/कृषी अभियांत्रिकी/जैवतंत्रज्ञान/कृषी सूक्ष्मजीवशास्त्र/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/बी.टेक – कृषी अभियांत्रिकी) पदवीमध्ये ५०% गुण.
    • त्यानंतर मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठातून २ वर्षांची पदविका (डिप्लोमा) पूर्ण केलेली असावी.

इतर अटी आणि शर्ती:

  • वयोमर्यादा: अर्जदाराचे वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (SC/NT आणि इतर श्रेणींसाठी नियमांनुसार शिथिलता लागू.)
  • उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जपत्रिकेतील सर्व तपशील भरावा.
  • मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांची छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक आहे.
  • या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ११ महिन्यांसाठी (किंवा प्रकल्प कालावधी संपेपर्यंत, जो कमी असेल तो) नेमणूक दिली जाईल.
  • नोकरी सोडायची असल्यास उमेदवाराने एक महिन्याची आगाऊ सूचना किंवा एक महिन्याचे वेतन जमा करणे बंधनकारक राहील.

मुलाखतीची माहिती:

  • अर्जाची अंतिम तारीख: ०७ जुलै २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीची तारीख व वेळ: १० जुलै २०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजता.
  • मुलाखतीचे स्थळ: प्राचार्य व सहयोगी अधिष्ठाता, कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री, दापोली यांच्या कार्यालयात.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी निर्धारित वेळेत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.