रत्नागिरी : काश्मीर ते कन्याकुमारी देशभरात सहकार चळवळ बांधण्यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकारिता मंत्रालयाची स्थापना केली. सहकार पुरस्कारसाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त प्रस्ताव १८ जुलैपर्यंत दाखल व्हावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. ही कार्यशाळा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात काल (ता. ३) झाली. जिल्हा उपनिबंधक शिंदे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विकास संस्था, फेडरेशन ग्रुप यांच्या समूहावर सर्व निकष, विविध माहिती दिली जाते.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त गावातून सहकार पुरस्कारसाठी प्रस्ताव यावेत, अशी अपेक्षा आहे.
याप्रसंगी आदर्श लेखा परिक्षण या विषयावर जिल्हा विशेष लेखा परीक्षक विनोद अंडुस्कर यांनी मार्गदर्शन केले. आदर्श संचालक मंडळ सभा विषयावर स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. उत्तम पद्धतीने आपापली संस्था मार्गस्थ व्हावीत. व्यवहार स्वच्छ राहावेत. ज्या उद्देशाने संस्था स्थापन केली तो सफल व्हावा, यासाठी संचालक मंडळांची सभा ही महत्त्वाची असते, असे सांगितले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले.
शासकीय लेखा परीक्षक महेश जाधव यांनी आदर्श लेखा परिक्षण, सहायक निबंधक साहेबराव पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण आणि कोमसापचे गजानन पाटील उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 05/Jul/2025














