रत्नागिरी : जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी २९ जुलै रोजी

रत्नागिरी : पडवे (ता. राजापूर) येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावीसाठी निवड चाचणी https://navodaya.gov.in ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जुलै आहे.

जवाहर नवोदय विद्यालयाच्या २०२६-२७ या सत्रासाठी सहावीसाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पाचवीत शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.

प्रत्यक्ष प्रवेश परीक्षा जिल्ह्यातील विविध केंद्रावर १३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. अधिक माहितीसाठी निवड चाचणी परीक्षा प्रमुख नागेश शेकडे (९०२१३३४४३३) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 05-07-2025