चिपळूण : गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल, खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल, गोवळकोट या विद्यालयात नुकतेच प्रयोगशळा इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास आ. शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. कलाशिक्षक उदय मांडे यांनी तैलचित्र देऊन आ. निकम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. निकम यांनी शिक्षण संस्थेचे विशेष कौतुक केले. सामाजिक कार्यकर्ते शौकत मुकादम यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल, प्लास्टिकचा वापर टाळण्यासह पाणी वाचवा मोहिमेविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. सिराजुद्दीन चौगले तसेच खेरूल इस्लाम एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे अध्यक्ष मोहम्मद अहमद खान यांनी संस्थेचे विशेष कौतुक करतानाच सहकार्याची ग्वाही दिली. चेअरमन डॉ. इसहाक खतीब यांनी मार्गदर्शन केले. गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बेग अब्दुल अजीज अ. रज्जाक, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, इम्रान कोंडकरी, लियाकत खतीब, शफी चांदा, केपिएफ अध्यक्ष दिलावर चोगले, जमीर मुल्लाजी, संस्थेचे व्हा. चेअरमन जफर कटमाले, मुजाहिद मेयर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 16/Oct/2024









