चिपळूण : मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण झोनच्या कबड्डी स्पर्धा टी. बी. के. महाविद्यालय भरणे (खेड) येथे झाल्या. या स्पर्धेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांचे २९ संघ सहभागी झाले होते. या संघाला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये आनंदराव पवार महाविद्यालयाचा विद्यार्थी श्रेयस शिंदे हा उत्कृष्ट चढाईपट्ट ठरला. तसेच पुढील मुंबई विद्यापीठाच्या इंटर झोन स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे श्रेयस शिंदे, अमर कश्यप, जय बागल या विद्यार्थ्यांची कोकण झोन संघामध्ये निवड झाली आहे. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ तसेच संस्थेचे रजिस्ट्रार आणि पी. आर. ओ. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रशिक्षक, प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 16/Oct/2024









