यशस्वी जयस्वालची कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी, द्रविड-सेहवागचा विक्रम मोडला

कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी जयस्वालने नवा अध्याय लिहिला आहे. यशस्वी जयस्वालने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ही कामगिरी केली. यासह त्याने दिग्गज राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

एजबेस्टन कसोटीच्या दोन्ही डावात मिळून यशस्वी जयस्वालने 115 धावांची खेळी केली. त्याने पहिल्या डावात 87 धावा, तर दुसऱ्या डावात 28 धावा केल्या. यासह यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या.

यशस्वी जयस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 2000 धावा करणार भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर होता.

राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांनी 25 कसोटी सामन्यातील 40 डावात 2000 धावा केल्या होत्या. टीम इंडियासाठी सर्वात कमी सामन्यात आणि कमी डावात 2 हजार धावा करणारे फलंदाज ठरले होते. मात्र हा विक्रम आता यशस्वीने मोडला आहे. 

यशस्वी जयस्वालने 21 कसोटी सामन्यांच्या 40 डावात 2 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. तसं पाहिलं तर 2000 धावा करण्यासाठी 40 डाव लागले. पण 4 कसोटी त्यांच्या तुलनेत कमी खेळला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 05-07-2025