राजापूर : काम सुरू असताना डोक्यात लादी पडून कामगार जखमी

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील वेरवली रेल्वे स्टेशन येथे बिल्डिंगचे काम करताना डोक्यात लादी पडून गंभीर जखमी झालेल्या कामगारावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शुक्रवार जुलै रोजी रात्री ९ वा. सुमारास घडली. राजू गांचू दुर्वे (२९, मूळ रा. मध्यप्रदेश, सध्या रा. राजापूर) असे जखमी कामगाराचे नाव आहे. तो शुक्रवारी रात्री वेरवली रेल्वे स्टेशन येथील इमारतीचे काम करत असताना त्याच्या डोक्यात लादी पडली. इतर कामगारांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 07/Jul/2025