रत्नागिरी : शहरातील आदमपूर येथे बेकायदेशिरपणे मटका जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार, ५ जुलै रोजी दुपारी १२.३५ वा. सुमारास करण्यात आली. प्रदिप प्रकाश रजपूत (४०, रा. धनजी नाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल अमोल भोसले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी संशयित हा आदमपूर येथे लोकांकडून पैसे स्विकारुन स्वतः च्या फायद्यासाठी मटका जुगार खेळ चालवत असाताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ हजार ५५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 07/Jul/2025









