चिपळूण : राज्याच्या कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढीसाठी शेतकरी सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या मनोबलात वाढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे कृषी उत्पन्नात भर पडते आणि इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळते. यातून राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात मोलाची भर पडते.
या पार्श्वभूमीवर, राज्यस्तरीय व रत्नागिरी जिल्ह्यातील पीक स्पर्धेचे निकाल यापूर्वीच जाहीर झाले आहेत. आता चिपळूणातील पीक स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात येत आहे.
चिपळूण तालुक्याची भात पिकाची सरासरी उत्पादकता २६.५३ क्विंटल असून, नाचणी पिकाची सरासरी उत्पादकता १२.८८ क्विंटल आहे. या स्पर्धेत भात पिकासाठी एकूण २५ अर्ज प्राप्त झाले होते, तर नाचणी पिकासाठी २ अर्ज प्राप्त झाले होते. तालुक्याच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा दीडपट किंवा त्याहून अधिक उत्पादकता नोंदवणाऱ्या शेतकरी पीक स्पर्धा पुरस्कारासाठी योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र ठरतात.
चिपळूण तालुक्यातील पीक स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
भात पीक १. नारायण धोंडू दुर्गोली, गावः वीर, २. सुनील बाबाराव शिंदे, गावः शिरगाव, ३. रुक्मिणी काशिनाथ रहाटे, गावः मिरवणे नाचणी सुरेश सोमा शिगवण, गावः मुर्तवडे, खरीप २०२५ पीक
स्पर्धा : सहभागाचे आवाहन पुढील खरीप हंगामात (२०२५)
पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. चिपळूणातील शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन मेहनतीचे फळ मिळवावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. सहभागासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ आहे. अधिक माहितीसाठी सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 07/Jul/2025














