लांजा : खेरवसे बौध्दवाडीत बिबट्याचा पाळीव प्राण्यांवर हल्ला

लांजा : लांजा तालुक्यातील गवाणे येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याला जेरबंद केल्याची घटना ताजी असतानाच आता बिबट्याने खेरवसे गावात आपली दहशत सुरू केली आहे. खेरवसे बौध्दवाडी येथे शनिवारी सायंकाळी पाळीव कुत्रा व मांजराला आपले भक्ष्य केले. बिबट्याची दहशत सुरू झाल्याने शेतकरीवर्गात भीती पसरली आहे.

शनिवारी सायंकाळी ७.४५ च्या दरम्यान, लोकवस्तीत शिरून माणसांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून दोन तासाने पुन्हा एका पाळीव मांजराला फस्त केल्याची घटना घडली. नागरिकांनी आरडा-ओरडा केल्याने बिबट्याने शेजारील रानात पळ काढला. बिबट्याने लोकवस्तीत शिरून पाळीव प्राण्यांवर केलेल्या हल्यामुळे शेतीच्या कामात व्यस्त असणारे शेतकरीवर्गामध्ये भीतीच्या छायेखाली शेतात जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 07/Jul/2025