संगमेश्वर : महामार्गावरून जात असताना डोंगरावरील दगड लागून दुचाकीस्वार जखमी

संगमेश्वर : कुरधुंडा येथे डोंगर मोठ्या यंत्राच्या सहाय्याने फोडण्याचे काम सुरू आहे. रमजान गोलंदाज यांना दुचाकीवरून जाताना वेगात आलेले दगड लागून ते जखमी झाले. त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. संबंधित ठेकेदार कंपनीविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गोलंदाज हे महामार्गावरून जात असताना कुरधुंडा येथे डोंगर पोकलेनच्या सहाय्याने फोडण्याचे काम सुरू असताना काही दगड आजूबाजूला उडाले. त्यातील दगड रमजान यांच्या पायाला-हाताला लागून दुखापत झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 07/Jul/2025