उत्पादनाकरिता चारसूत्री भात लागवडीचा अवलंब करणे काळाची गरज

पावस : प्रत्येक शेतकऱ्याने पूर्ण पारंपरिक भातशेतीला बगल देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भातशेतीच्या उत्पादनाकरिता चारसूत्री भात लागवडीचा अवलंब करणे काळाची गरज असून, भविष्यात भातशेतीचे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळू शकेल आणि आर्थिकदृष्ट्या भातशेती करणे परवडेल, याकरिता शेतकऱ्याने भात लागवडीचा अवलंब केला पाहिजे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी केले. चारसूत्री लागवडीचे प्रात्यक्षिक शेतीच्या बांधावर घेताना ते बोलत होते.

खेड तालुक्यातील कुरवळ जावळी येथे चारसूत्री लागवडीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी खेड तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी स्वतः चारसूत्री लागवड केली. त्यासोबतच मंडळ कृषी अधिकारी कार्यालय लवेल येथील सर्व सहायक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी उपस्थित होते. अनंत उतेकर यांच्या शेतावरती प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 07/Jul/2025