रत्नागिरी : वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने नाचणे क्र. १ शाळेत सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते राजेश देशपांडे यांनी ऑनलाईन आणि लेखक, कवी, अभिनेते सचिन काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लेखक आपल्या भेटीला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशपांडे यांनी खूप वाचाल तर खूप मोठे व्हाल. रत्नागिरीत खूप रत्नं होऊन गेली आहेत. आपणही असेच वाचून मोठे व्हा, असा संदेश ऑनलाईन उपस्थित राहून दिला.
सचिन काळे यांनी मुलांना गोष्टी सांगत संवाद साधला. मुलांनी त्यांच्या कवितेला उत्स्फूर्तपणे दाद दिली. या वेळी केंद्रप्रमुख रेहाना म्हसकर, मुख्याध्यापक अनुप्रीता आठल्ये, दीपक नागवेकर, प्रा. सुनील जोपळे, शरदिनी मुळ्ये, विनोदिनी कडवईकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 16-10-2024









