खेडच्या शमा बुटाला यांची अमेरिकेतील ‘दी टॉप वूमन लीडर्स’ किताबाला गवसणी

खेड : कोकणातील खेडच्या एका लेकीने आपल्या स्वकर्तृत्वावर यशाचे शिखर गाठत अमेरिकेत सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या व सर्वश्रेष्ठ असणाऱ्या ‘दी टॉप वूमन लीडर्स ऑफ इअर २०२५’ या किताबाला गवसणी घातली आहे. हा सर्वोच्च सन्मान मिळवणारी ती प्रथम महाराष्ट्रीयन आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंचवली या छोट्याशा गावातील शमा बुटाला व लग्नानंतरच्या शमा केसकर यांनी हे यश मिळविले आहे. त्या सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत; मात्र त्यांची नाळ आजही कोकणाशी जोडली गेली आहे. त्यांचे कुटुंब हे मुंबई अंबरनाथ येथे वास्तव्यास असून, त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण हे मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर तिने अमेरिकेत मास्टर्स इन कम्युनिकेशन केली. अमेरिकेत तिने विविध टेक कंपनीत वरिष्ठ पदावर काम करून नावलौकिक मिळवला व स्वतःला सिद्ध केले. त्या सध्या अमेरिकेत स्टेल्थ एआय स्टार्टअप कंपनीत मुख्य टेक्नॉलॉजी ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल अमेरिकेने घेत केसकर यांना यंदाचा दी टॉप वूमन लीडर्स ऑफ इअर २०२५ हा किताब देऊन सन्मानित केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 07/Jul/2025