रत्नागिरी : ब्राऊन शुगरप्रकरणी अटकेतील संशयिताला न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी : शहरातील मेस्त्री हायस्कूलच्या मागे निवखोल रस्त्यावर तब्बल ३४ हजार रुपयांच्या ब्राऊन हेरॉईनसह अटक करण्यात आलेल्या संशयिताला न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. इबादुल्ला मुजीब पावसकर (वय २६, रा. राजिवडा नाका, रत्नागिरी) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या बाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार शांताराम झोरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी संशयित इबादुल्ला पावसकर हा निवखोल रोड येथे आपल्या ताब्यातील प्लास्टिक पिशवीमध्ये ४ ग्रॅमचा ब्राऊन हेरॉईन या अमली पदार्थासह त्याला मुद्देमालासह अटक करण्यात आली होती. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 16/Oct/2024