अनंत मोहिते यांची पदवीधर शिक्षक संघटना रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड

चिपळूण : महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या रत्नागिरी शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी खेडचे अनंत सीताराम मोहिते, पदवीधर शिक्षक शाळा राजवेल मराठी यांची निवड करण्यात आली.

सन २०१९ साली जिल्हा परिषद रत्नागिरी आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २७ वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना उत्तम अध्ययन व अध्यापन करत असताना संघटनेच्या विविध पदावर काम केले आहे. खेड तालुका पदवीधर शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी उत्कृष्ट काम केले आहे. खेड तालुक्यात काम करत असताना तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या प्रत्येक अडी अडचणी मध्ये त्यांच्या बरोबर ठाम पणे उभे राहून उत्तम सहकार्य केले आहे. तसेच वरिष्ठ अधिकायांच्या संपर्कात राहून समन्वय साधण्याचेही काम उत्तमपणे करत आहेत. असे आदर्श, धडाडीचे व कामसु पदवीधर शिक्षक अनंत मोहिते यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 07-07-2025