रत्नागिरी : तालुक्यातील फणसोप वायंगणी फाटा येथे जिना चढत असताना तोल जाऊन पडलेल्या वृध्दाचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात शुक्रवार, ४ जुलै रोजी मृत्यू झाला.
वसंत उलगप्पा भिंगारे (७४, रा. फणसोप, वायंगणी फाटा, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते १९ जून रोजी सकाळी ८.३० वा. सुमारास आपल्या घरातील जिना चढत असताना तोल जाऊन पडले होते. त्यांना प्रथम जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 07/Jul/2025














