राजापूर : तालुक्यातील कणेरी, टोकळवाडी येथील रिक्षाचालक नीलेश काशिनाथ शिरवडकर (वय ४९) यांचा डोंगर धार येथे आकस्मित मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. रिक्षाचालक नीलेश शिरवडकर हे वैशाली गावीलकर यांना डोंगर दत्तवाडी येथे सोडून परत येत असताना रस्त्याच्या कडेला ते बेशुद्ध अवस्थेत आढळले.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश शिरवडकर हे रिक्षा (क्र. एम.एच.०८ बी.सी ०८५३) घेऊन भाडे सोडण्यासाठी डोंगर दत्तवाडी येथे गेले होते. दुपारी १२:३० वा.च्या सुमारास ते डोंगर धार येथून परत येत असताना, रस्त्याच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 07/Jul/2025














