राजापूर : ओणीतील गगनगिरी आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन

राजापूर : तालुक्यातील गंगातीर्थपासून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र ओणी येथील स्वामी गगनगिरी महाराजांच्या आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ९ जुलै ते १० जुलै या कालावधीत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

आश्रमात भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण, होमहवन, भंडारा तसेच उल्हासगिरी महाराजांचा जन्मदिन असे कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी सायंकाळी पाद्यपूजन, औंक्षण, ५६ भोग नैवेद्य अर्पण व महाआरती करण्यात येईल. त्यानंतर सन्मान सोहळा होणार आहे. गुरुवारी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजनाचा सोहळा होणार आहे. या दिवशी काकड आरती, सकाळी मंगळ आरती, त्यानंतर स्वामी योगिराज गगनगिरी महाराजांच्या पादुकांवर अभिषेक, दुपारी १२ वाजता होमहवन, महाआरती, महाप्रसाद देण्यात येईल. त्यानंतर विजय परब यांचे भजन होईल. यानिमित्ताने गुरुवारी रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 07/Jul/2025