रत्नागिरी : जिल्ह्यात ५४ किसान समृद्धी सेवा केंद्रे होणार सुरू

रत्नागिरी : शेतकऱ्यांना सर्व सेवासुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र ही योजना सुरू करण्यात येत आहे. एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, अवजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध हाणार आहे. जिल्ह्यात अशी ५४ केंद्रे सुरू होणार आहेत. सध्या तालुका, गाव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रे आहेत. आता एका छताखाली सर्वकाही कृषी व्यवस्थेत रुपांतर करताना शेतकऱ्यांना कृषीच्या सर्व सेवा- सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 16/Oct/2024