चिपळूण : क्रीडा युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय १९ वर्षे वयोगट अंतर्गत सायकलिंग स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आंबडस या विद्यालयातील युवराज चव्हाणने तृतीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा कुडाळ बालमवाडी येथे झाली. त्याचे सह्यादी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आ. शेखर निकम यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्याला विद्यालयातील सहायक शिक्षक भास्कर महाडिक व सहायक शिक्षक गणेश सावर्डेकर तसेच सहायक शिक्षक संतोष शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 16/Oct/2024









