रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट परिसरात मंदिरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. पन्हाळी बुद्रुक येथील जाखमाता मंदिरातून आणि देव्हारे येथील स्वयंभू शिवमंदीरातून एकूण २७,००० रुपये किमतीच्या सहा घंटा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ४ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ ते ५ जुलै २०२५ रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान घडली.
चंद्रकांत लक्ष्मण जाधव (वय ५२, रा. पन्हाळी बुद्रुक, पो. चिंचघर, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांनी ६ जुलै २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता बाणकोट पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्याने मंदिरांचे दरवाजे उघडे असल्याचा फायदा घेत आतमध्ये प्रवेश केला आणि तांबे, पितळ, कांस्य या तीन धातूंपासून बनवलेल्या एकूण सहा घंटा चोरून नेल्या.
चोरी गेलेल्या घंटांचा तपशील खालीलप्रमाणे:
१०,००० रुपये किमतीची एक घंटा, सुमारे २० किलोग्रॅम वजनाची, तांबे, पितळ, कांस्य मिश्रित.
६,००० रुपये किमतीची एक घंटा, सुमारे १० किलोग्रॅम वजनाची, तांबे, पितळ, कांस्य मिश्रित, जुनी वापरती.
६,००० रुपये किमतीची एक घंटा, सुमारे १२ किलोग्रॅम वजनाची, तांबे, पितळ, कांस्य मिश्रित, पिवळसर रंगाची, जुनी वापरती.
४,००० रुपये किमतीच्या प्रत्येकी २००० रुपये किमतीच्या दोन घंटा, प्रत्येकी सुमारे ०४ किलोग्रॅम वजनाच्या, तांबे, पितळ, कांस्य मिश्रित, पिवळसर रंगाच्या, जुन्या वापरत्या.
१,००० रुपये किमतीची एक घंटा, सुमारे ०२ किलोग्रॅम वजनाची, तांबे, पितळ, कांस्य मिश्रित, पिवळसर रंगाची, जुनी वापरती.
या दोन्ही घटनांमध्ये देव्हारे येथील पोलीस पाटलांच्या संमतीशिवाय चोरट्याने हा गुन्हा केला आहे. बाणकोट पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून (गु.र.नं. ०९/२०२५), अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मंदिरांमधून चोरी होण्याच्या या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 07-07-2025














