Maharashtra Weather Update: राज्यात पुढील 2-3 दिवसांत पावसाचा जोर वाढणार..

मुंबई : Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी आहे. बहुतांश महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

आज (7 जुलै ) चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर व भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे .

रायगड जिल्ह्यासह पुणे व सातारा घाटावरही जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय .

मुंबई ठाण्यासह उर्वरित कोकणपट्टीला येलो अलर्ट आहे .मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार आहे .

सर्वकाळ छत्रपती संभाजीनगर, जालना परभणी ,हिंगोली व नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट असून जळगाव, धुळे, नंदुरबार व यवतमाळला पावसाचा यलो अलर्ट आहे .

उत्तर महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमध्ये येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे .

पश्चिम बंगालच्या आमच्या पश्चिमेकडील कमी दाबाचे क्षेत्र व त्यासंबंधीत CYCIR पुढील दोन ते तीन दिवसात वायव्यकडे सरकण्याची शक्यता आहे .

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:10 07-07-2025