महिलांनो आत्मनिर्भर व्हा! LIC ची ‘विमा सखी’ योजना देणार दरमहा ₹7000 आणि आकर्षक कमिशन

रत्नागिरी : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक अनोखी ‘विमा सखी’ स्वयंरोजगार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या महिलांना दरमहा ७,००० रुपये मानधन आणि आकर्षक कमिशन मिळवून LIC मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • मासिक मानधन: विमा सखींना दरमहा ७,०००/- रुपये मानधन मिळेल, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल.
  • घरून काम करण्याची संधी: हे काम घरबसल्या करता येणार असल्याने, महिलांना इतर कामे सांभाळून फावल्या वेळेत उत्पन्न मिळवता येईल.
  • आकर्षक कमिशन: केलेल्या विमा कामगिरीवर आधारित आकर्षक कमिशन दिले जाईल. इतर विमा प्रतिनिधींना मिळणारे सर्व लाभ ‘विमा सखीं’नाही मिळतील.
  • पात्रता: किमान १८ वर्षे पूर्ण असलेली आणि दहावी उत्तीर्ण कोणतीही महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते.
  • प्रशिक्षण: अर्ज करणाऱ्या आणि निवड झालेल्या महिलांना LIC द्वारे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल.
  • उत्तम साईड बिझनेस: ब्युटिशियन, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनी, गृहिणी, खाजगी नोकरी करणाऱ्या किंवा छोटा व्यवसाय करणाऱ्या सर्व महिलांसाठी हा एक उत्तम ‘साईड बिझनेस’ आहे, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल.

या योजनेत सहभागी होऊन आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी लगेचच खालील व्हॉट्सॲप क्रमांकावर आपले संपूर्ण नाव आणि पत्ता पाठवावा. त्यानंतर दत्तप्रसाद केळुसकर (LIC Associate, LIC रत्नागिरी ब्रँच) यांचे प्रतिनिधी तुम्हाला अधिक माहिती देण्यासाठी संपर्क साधतील.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा : दत्तप्रसाद केळुसकर LIC ASSOCIATE LIC रत्नागिरी ब्रँच मोबाईल: ९९२१४७६८०६

ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासोबतच, त्यांना सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी एक चांगला मंच उपलब्ध करून देईल.