खेड : तालुक्यातील कुळवडी देउळवाडी येथे एका सामाजिक उपक्रमाच्या वेळेसंदर्भातील वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. यात दोघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोघांकडून खेड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. या घटना ५ जुलै रोजी घडल्या.
कुळवडी देउळवाडी येथे एका सामाजिक उपक्रमाच्या वेळेसंदर्भातील वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात रंजित राजाराम निकम (वय ४०) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर खेड पोलिसांनी गणेश दिलीप निकम (रा. कुरवंडी लाडवाडी, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश निकम याचे वडील दिलीप निकम यांच्या वाढदिवसानिमित्त कुळवडी येथील शाळेत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सकाळी ९ वाजता वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र कार्यक्रम तब्बल ११.३० वाजता सुरू झाला. फिर्यादी रंजित निकम यांनी कार्यक्रमाच्या उशिरावरून प्रश्न विचारले होते आणि आपल्या दोन मुलांना शाळेतून घरी घेऊन गेले होते. त्यानंतर दुपारी रंजित निकम हे त्यांच्या घराच्या अंगणात असताना आरोपी गणेश निकम व त्याचा भाऊ रूपेश निकम मोटारसायकलवरून आले. दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात गणेशने रंजित यांना धक्का दिला.
वाद वाढताच रंजित यांच्या पत्नीने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिच्या कपड्याची ओढाताण करत तिला खाली पाडण्यात आले. त्यानंतर आरोपी गणेश निकम याने आपल्या खिशातून लोखंडी फायटर काढून रंजित निकम यांच्या डाव्या बाजूच्या डोक्यावर घातक वार केला, ज्यामुळे ते जखमी झाले. वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळेवरून झालेल्या वादातून रागाच्या भरात झालेल्या झटापटीत गणेश दिलीप निकम (३०) या युवकाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या घटनेबाबत खेड पोलिस ठाण्यात परस्परांच्या विधोरात गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 08/Jul/2025














