रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा दुर्वांकूर देवघरकर राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचा मानकरी!

खेड : खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी कु. दुर्वांकूर संतोष देवघरकर याने निमंत्रित राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकावून शाळेचे नाव उज्वल केले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशभरातील सुमारे ३०० ते ३५० मल्लखांबपटूंनी सहभाग घेतला होता.

१८ वर्षांवरील वयोगटात, इयत्ता १०वी मध्ये शिकणाऱ्या दुर्वांकूरने पहिला क्रमांक पटकावत आपले कौशल्य सिद्ध केले. विशेष म्हणजे, दुर्वांकूर गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र सी.बी.एस.ई. संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तो इयत्ता पहिलीपासूनच मल्लखांबाचा सराव करत असून, त्याने यापूर्वीही तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

दुर्वांकूरच्या या लक्षवेधी यशामुळे सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. त्याला मल्लखांब शिक्षक श्री. गौरव आंब्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दुर्वांकूरचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्वांकूरने मिळवलेल्या या यशामुळे जिल्ह्याचे आणि शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 08-07-2025