एसटीच्या दरवाढीमुळे आवडेल तेथे प्रवास योजनेला फटका

रत्नागिरी : राज्यात एसटीच्या तिकीट दरात १४.९५ टक्के दरवाढ केल्यानंतर आवडेल तेथे प्रवास या योजनेला ही फटका बसला आहे. या योजनेची ही दरवाढ करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आवडेल तेथे प्रवास या योजनेत ५०० ते १००० रुपयांची तफावत होत असल्यामुळे ही योजना महागली आहे. त्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी प्रवासी घटले आहे. जिल्ह्यासह राज्यात ही या योजनेला उतरती कळा लागत आहे. लाखों, कराडोंची होणारी उलाढाल आता कमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या पासेससाठी वेगळा नियम करून सवलत मिळावी, अशीच मागणी सर्वसामान्य प्रवासी, संघटना करत आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १९८८ साली दहा दिवसांसाठी पास देत आवडेल तेथे प्रवास ही योजना सुरू केली. एप्रिल २००६ मध्ये योजनेची पुनर्रचना करण्यात आली. दहा दिवसांचा पास रद्द करून ४ दिवस आणि ७ दिवस पासचा समावेश करण्यात आला.

पासधारकांमध्ये तीर्थक्षेत्रासह, पर्यटन स्थळांकडे, कोकणातील रत्नागिरी शहर, गणपतीपुळे, विविध प्राचीन मंदिरे, समुद्रकिनारे, यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर या ठिकाणी कामानिमित्त, पर्यटनानिमित्त जात असतात.

कमी खर्चात महाराष्ट्राचा प्रवास होत असल्यामुळे या पासला मोठी मागणी असते. शहर वाहतुकीसह राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीत एसटी ज्या ठिकाणी पोहोचते अशा सर्व ठिकाणांपर्यंत या पासची वैधता आहे. पासधारकांना आरक्षण करून प्रवासाची मुभा आहे. यासाठी स्वतंत्र आरक्षण शुल्क भरावे लागते. प्रौढ, तरुणांसाठी दर वेगवेगळे आहेत. एसटीचा वाढत जाणारा खर्च, डिझेल, टायर, वाढता पगार, महामंडळाला होणारा तोटा याचा विचार करून महामंडळाने एसटीमध्ये १४.९५ टक्के भाडेवाढ केली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसला. त्यामुळे प्रवासी व विविध संघटना, पक्षांनी या दरवाढीचा विरोध केला. मात्र, भाडेवाढ कायमच राहिली. आता आवडेल तेथे प्रवास या योजनेची भाडेवाढ करण्यात आली आहे. पूर्वी चार दिवसांच्या पाससाठी ११७०, सात दिवसांसाठी २०४० असे दर होते, त्यामध्ये आता वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात आवडेल तेथे प्रवास या योजनेला कमी प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी मोठ्या प्रमाणात घटल्याचे सांगण्यात आले.

आवडेल तेथे प्रवास या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे लाखोंची उलाढाल होत आहे. दरवाढीमुळे थोडी संख्या कमी झाली आहे- सचिन सुर्वे, वाहतूक निरीक्षक, रत्नागिरी

एसटी विभागाच्या वतीने दरवाढ केल्यामुळे आवडेल तेथे प्रवास ही महागला आहे. त्यामुळे या योजनेला फटका बसला आहे. नेहमी पास काढून महाराष्ट्रभर फिरणाऱ्यांची संख्या अधिक होती. आता एक पासेसमागे ५०० ते १००० रुपयांची तफावत आहे. त्यामुळे पास काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे-सोहम बापट, एसटी प्रवासी मित्र, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 08/Jul/2025