राजापूर शहरात विकासाची नवीन प्रथा : अॅड. जमीर खलिपे

राजापूर : विकासाची अशी नवीन प्रथा राजापूर शहरात सुरू आहेत. नगपालिका निवडणुका तोंडावर आल्याने शहरातील एका मोठ्या पक्षाच्या शहरप्रमुखाला आता पावसाळ्यातील विकास आठवला आहे. मात्र याला शहराचा विकास म्हणावं, शहर भकास करण म्हणावं की भ्रष्टाचार म्हणावा, याचा विचार आता नागरीकच करतील, असा टोला राजापूर नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी लगावला आहे.

दोन वर्षांपूर्वी कोट्यवधी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या जवाहर चौक ते जकातनाका रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरीकांसह वाहन चालकांना नाहक त्रास सहन लागत आहे. याबाबत नागरीकांतून प्रचंड संताप व्यक्त झाल्यानंतर आता खड्डे पडलेल्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवून पावसाळ्यानंतर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येईल, असे या शहरप्रमुखाकडून सांगण्यात येत आहे. मात्र स्वतःच्या प्रभागातील एक रस्ता मागील चार महीने पूर्ण न करू शकणाऱ्या या शहरप्रमुखाला निवडणूक जवळ आल्याने शहराचा विकास दिसू लागल्याचा टोला अॅड. खलिफे यांनी लगावला आहे.

जवाहर चौक ते जकातनाका रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गेली दोन वर्षे या रस्त्यावर खड्डे पडत आहेत. मात्र या शहरप्रमुखांना आतापर्यंत हे खड्डे दिसले नाहीत. मात्र आता निवडणूक जवळ आली तसे जवाहर चौक ते जकातनाका या मुख्य रस्त्यासोबत महापूरूष घुमटी, मापारी मोहल्ला, बलबले मशिद तसा कोंढेतड ब्रीज ते मशिद रस्ता अशा रस्त्यांवरील खड्डेही दिसू लागले आहेत. आम्ही विकासाच्या आड केव्हाही येणार नाही, मात्र शहरवासीयांची दिशाभूल करण्यासाठी, ठेकेदार भल्यासाठी, जर कामे होणार असतील तर जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

शहरात जी विकासकामे सुरू आहेत, ती विकासाची नसून वैयक्तिक आहेत. ठेकेदार राहिलेत बाजुला कार्यकर्ते ठेकेदार म्हणून कामे करत आहेत. त्यामुळे कामाचा दर्जा पूर्णपणे ढासळला असून अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत आणि जी पूर्ण झाली आहेत त्यांचा दर्जा पहिल्या पावसात उघड झाला आहे, असे ॲड. खलिफे यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 08/Jul/2025