संगमेश्वर : संगमेश्वर शास्त्रीपूल ते ओझरखोलदरम्यानच्या महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल सुरू आहेत. या खड्ड्यांमध्ये तात्पुरती खडी टाकून त्यांना बुजवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला असला, तरी ही उपाययोजना अपुरी ठरत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
महामार्गावरील खड्डे व दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता हा रस्ता सध्या अतिशय धोकादायक ठरत आहे. पावसामुळे डोंगरउतारांवरील माती व खडक रस्त्यावर कोसळत आहेत.
त्यामुळे प्रवास अधिकच धोकादायक बनत आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार खड्डे भरताना योग्य ती सुरक्षाव्यवस्था ठेवली जात नाही. अपुऱ्या कामामुळे खड्डे भरले तरी काही दिवसांतच पुन्हा तयार होतात आणि वाहनचालकांना त्याचा फटका बसतो. प्रशासनाने या मार्गावर कायमस्वरूपी खड्डे बुजवण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच दरडी कोसळण्याच्या संभाव्य भागांवर योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे; अन्यथा अजूनही अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 08/Jul/2025














