साडवली : देशसेवा करताना वीरगती प्राप्त झालेल्या तसेच जखमी झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत व्हावी, या हेतूने देवरूखमधील सामाजिक भान जपणारे सामाजिक कार्यकर्ते मदन मोडक व मंजिरी मोडक या दांपत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ११ लाखांचा धनादेश शहा यांच्याकडे सुपूर्द केला.
मदन मोडक सामाजिक बांधिलकी जपत देशसेवा करत असतात. देशसेवेसाठी लढणाऱ्या बीएसएफ, एनएसजी, सीआयएसएफ, आयटीबीपी जवानांच्या मदतीसाठी मदन मोडक यांनी ११ लाखांची बहुमोल मदत दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मदन मोडक यांनी हा धनादेश शहा यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी केंद्रीय उद्यानमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. अमित शहा यांनी मदन मोडक, मंजिरी मोडक यांचे आभार मानले. याआधी मदन मोडक यांनी वनवासी कल्याण विभागासाठी एक कोटी ११ लाख रुपयांची देणगी दिली आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 08/Jul/2025














