रत्नागिरीत सार्वजनिक रस्त्यावर दगड ठेवून अडथळा निर्माण, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चांदसर्या ते पानवळ घवाळीवाडी या ग्रामीण रस्त्यावर (मार्ग क्र. १६६) सार्वजनिक रहदारीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९:४५ ते १०:१५ या वेळेत गौतम नगर कमानीजवळ, चंद्रकांत रघुनाथ मुळे यांच्या बागेजवळ घडली.

याबाबत सौ. तनिष्का भाग्यवान होरंबे (वय २६, रा. पानवळ, होरंबेवाडी) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, गिरीश विलास मुळ्ये (रा. पानवळ, ता. जि. रत्नागिरी) या आरोपीने ग्रामपंचायत रजिस्टर नमुना क्र. २३ वरील रस्त्यावर, म्हणजेच गौतम नगर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जांभ्या दगडाचे चिरे (मोठे दगड) ठेवून रस्ता बंद केला.

या कृतीमुळे सार्वजनिक रहदारीला अडथळा निर्माण झाल्याने भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १२६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे अडथळा निर्माण करणे हा गंभीर गुन्हा असून, यामुळे स्थानिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 08-07-2025