लांजा : लांजा येथील अद्वैत पेट्रोल पंपाजवळ, शांतीनगर येथे धोकादायक पद्धतीने ट्रक उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ जून २०२५ रोजी दुपारी १:१० वाजता घडली.
याबाबत लांजा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई किशोर संतराम पवार (पोशि/९००) यांनी ७ जून २०२५ रोजी दुपारी ३:१७ वाजता तक्रार दाखल केली. त्यानुसार, अनिल शिवाजी मंडले (वय ३३, व्यवसाय ट्रक चालक, रा. कुवारबाव, ता. लांजा) याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी अनिल मंडले याने त्याचा अशोक लेलँड ट्रक (क्र. MH०८ DW ८६७७) रस्त्यात अशा पद्धतीने उभा केला होता की, त्यामुळे महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना आणि वाहनांना धोका निर्माण होऊ शकला असता, तसेच वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या या कृतीबद्दल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. लांजा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 08-07-2025














